अण्णांच्या जनलोकपालला मायावतींचा पाठिंबा

December 13, 2011 9:18 AM0 commentsViews:

13 डिसेंबर

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपालाच्या मागणीला मायावतींनी पाठिंबा दिला आहे. देशात सशक्त लोकपाल आलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केलीय. सध्याचं सरकारी लोकपाल कमकुवत आहे. त्यात बदल केले नाहीत तर बसपा त्याला विरोध करेल असा इशाराही त्यांनी दिला. पंतप्रधान, कनिष्ठ नोकरशाही आणि सीबीआय लोकपालच्या कार्यकक्षेत हवंय अशी मागणीही मायावतींनी केली. उद्याच्या लोकपालसंबंधी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बसपा या मागण्या मांडणार असल्याचंही मायावतींनी स्पष्ट केलं.

close