पुण्याजवळ सुखोई विमान कोसळले

December 13, 2011 9:36 AM0 commentsViews: 7

13 डिसेंबर

आज दुपारी पुण्याजवळच्या वाघोली भागात भारतीय वायूदलाचे सुखोई 30 MKI या लढाऊ विमानाला अपघात होऊन ते कोसळले. या अपघातात विमानाचे पायलट आणि को पायलट यांनी प्रसंगावधान राखून पॅराशुटच्या साहाय्याने बाहेर उडी मारल्याने ते बचावले आहेत.

विंग कमांडर सोहेल आणि फ्लाईट लेफ्टनंट नॉडीयार यांनी दुपारी 12 वाजुन 40 मिनिटांनी पुण्याच्या लोहगाव एअरबेसवरुन उड्डाण केलं. त्यानंतर 1 वाजून 10 मिनिटांनी वाघोली गावच्या वरुन उड्डाण करत असताना विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि तांत्रिक बिघाड झाला. उद्धभवलेली परिस्थिती ओळखून पायलटनी विमान निर्जन जमिनीवर आणत पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर उडी मारली. त्यामुळे या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. अपघातानंतर घटनास्थळी पुणे फायर ब्रीगेड आणि वायूदलाच्या डिझास्टर टीम दाखल झाली. वायूदलाकडे असलेली सुखोई 30 MKI ही लढाऊ विमानं नविन आहेत. आतापर्यंत मिग विमानांना अपघात होत होते. पण आता सुखोई सारख्या अत्याधुनिक विमानांनाही अपघात झाल्याने वायूदलाच्या लढाऊ विमानांच्या विश्वासहर्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिला आहे.

close