सहा वर्षांचा लिटल क्रिकेटर !

December 13, 2011 2:46 PM0 commentsViews: 3

13 डिसेंबर

मुंबईत सध्या 14 वर्षाखालील मुलांची गाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरलाय तो अवघ्या 6 वर्ष 10 महिन्याचा मुशीर खान. इतक्या लहान वयात अंडर 14 मॅच खेळणारा तो पहिला क्रिकेटर ठरला आहे. अंजुमन इस्लाम शाळेकडून मुशीर खान खेळत आहेत. आणि शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीविरुध्द ही मॅच सुरु आहे. मुशीर हा मुंबईचा राहणारा आहे आणि तो डाव्या हातानी स्पीन बॉलिंग करतो, त्याचबरोबर ओपनिंग बॅटिंगही करतो. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये त्याने 3 रन्सही केले.

close