भाजपचे आमदार पटोले 1 वर्षांसाठी निलंबित

December 13, 2011 9:53 AM0 commentsViews: 2

13 डिसेंबर

धानाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी धानाच्या मोळ्या विधानभवनाच्या पायर्‍यांवर जाळल्याने भाजपचे आमदार नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पटोले यांना एक वर्षासाठी म्हणजे पुढच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पटोले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर आमदार गणपतराव देशमुख यांनी पटोले यांच्या शिक्षेत घट व्हावी अशी मागणी केली. नाना पटोलेंनी या अगोदर 2008 मध्ये धानाच्या प्रश्नावरुन आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते काँग्रेसचे आमदार होते. यानंतर साकोली लाखणी या मतदारसंघातून 2009- मध्ये भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत.

close