इंडिया बुल्स प्रकरणी विरोधक आक्रमक; मनसे आमदारांचे निलंबन मागे

December 13, 2011 4:44 PM0 commentsViews: 1

13 डिसेंबर

नाशिक फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजकत्व इंडिया बुल्सने स्वीकारलं होतं आणि त्यांनी फेस्टिव्हलसाठी देणगी दिल्याने भुजबळ वादात सापडले आहे. याचे प्ाडसाद आज अधिवेशनातही उमटले. मनसेच्या आमदारांनी आज विधानसभा परिसरात भुजबळांविरोधात आंदोलन केलं. तर मनसेच्या दोन आमदारांनी विधानसभेतही बॅनर झळकावले.

त्यामुळे सभागृहात आक्षेपार्ह बॅनर फडकावल्याबद्दल मनसेच्या दोन आमदारांना एक दिवसाठी निलंबित करण्यात आलं होतं. नंतर हे आमदारांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितल्यानंतर निलंबन मागे घेण्यात आलं. मनसेचे नाशिकचे आमदार नितीन भोसले आणि कल्याणचे आमदार प्रकाश भोईर या दोन आमदारांवर, निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

त्यानंतर सर्व विरोधकांनी एकत्रयेत सरकारला याचा जाब विचारल्यावर भुजबळांनी सभागृहात स्पष्टीकरण दिलं. या देणगीचा प्रत्येक पैसा हा फेस्टिव्हलसाठी वापरण्यात आला. त्याची कोणीही चौकशी करावी असं स्पष्टीकरण भुजबळ यांनी विधानसभेत केला. त्यांच्या खुलाशावर विरोधक समाधानी झाले नाहीत. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मंत्र्यांच्या ट्रस्ट किंवा फाऊंडेशन्सनी खाजगी कंपन्यांकडून निधी घ्यावा का असा सवाल उपस्थित केला. यासंदर्भात सरकारनं नियमावली असतील तर तसं निवेदन करावं अशी मागणी केली.

close