संसदेवरच्या हल्ल्याला 10 वर्षे

December 13, 2011 10:32 AM0 commentsViews: 17

13 डिसेंबर

आज 13 डिसेंबर… संसदेवरच्या हल्ल्याला आज 10 वर्ष झालीत. हा हल्ला होता लोकशाहीचं प्रतिक समजल्या जाणार्‍या सभागृहावरचा…पण या हल्ल्याला एक दशक उलटलं तरी त्यातून आपण काही धडा घेतलाय का हाच खरा प्रश्न आहे.

भारतीय लोकशाहीवरचा हा सगळ्यांत मोठा हल्ला होता. या हल्ल्यानंतर काही पुरावे मागे उरले होते. हल्ल्यातील दहशतवादी वापरत असलेल्या सगळ्या फोन्सच्या मागे जे नंबर्स होते. त्यावरून पाकिस्तानचा यामागे हात असल्याचं उघड झालं. या हल्ल्यातला मुख्य आरोपी अफझल गुरू सध्या तुरूंगात आहे आणि त्याला फाशीची शिक्षा कधी होणार याची सगळेजण वाट पाहतायेत.

या हल्ल्यात 12 जणांचा बळी गेला आणि या हल्ल्यातले आरोपीही 12 होते. हल्ल्यामागे मोहम्मद अफझल गुरु हा सुत्रधार होता. त्याला फाशीची शिक्षा झाली. त्यानं नंतर दयेसाठी अर्ज केला. शौकत हुसेन गुरु हा अफजलचा भाऊ देखील या हल्याच्या कटात सामील होता. 10 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर त्याची सुटका झाली.

शौकतची पत्नी अफसान गुरु हीची देखील सुटका झाली. दिल्ली विद्यापीठातले प्राध्यापक एसएआर गिलानी यांची सुटका झाली. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर आणि तारीक मोहम्मद हे दोघंही सुत्रधार सध्या पाकिस्तानात आहेत. मुख्य सुत्रधार गाझी बाबा 2002 मध्ये काश्मीरमध्ये मारला गेला.

हल्ल्यामागचे सूत्रधार-

- मोहम्मद अफझल गुरू – फाशीची शिक्षा- शौकत हुसेन गुरू – अफझलचा भाऊ 10 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर सुटका.- अफसान गुरू- शौकतची पत्नी-सुटका- एसएआर गिलानी – दिल्ली विद्यापीठातले प्राध्यापक-सुटका- जैश-ए-मोहम्मद चा प्रमुख मोलाना मसूद अझहर – तारीक मोहम्मद- सूत्रधार-दोघेही पाकिस्तानमध्ये- पाच दहशतवादी हल्ल्यात मारले गेले- मुख्य सूत्रधार गाझी बाबा 2002 मध्‌ये काश्मीरमध्ये मारला गेला.भारतानंही या हल्ल्याचा प्रतिकार करण्याचं ठरवलं. या हल्ल्यानंतर संसदेभोवतीची सुरक्षा आणखी भक्कम झाली. पण या हल्ल्याने भारताला सुरक्षीत राष्ट्रं बनवलं का ?

13 डिसेंबरच्या या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरूद्ध मत तयार झालं. आज 10 वर्षांनंतर पाकिस्तान हाच खरा दहशतवादाचा प्रणेता हे दाखवून देण्यात कदाचित भारताला यश आलं असेल पण परिस्थितीत मात्र फारसा बदल झालेला नाही. आता या सप्टेंबरमध्ये दिल्ली हायकोर्टाचा आवारात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर अफझल गुरूला कदाचित फाशीची शिक्षा लवकरच होईल असं वाटत होतं. पण तसं काही झालेलं नाही. उलट काहीही होऊ दे आम्ही कुठेही कधीही जाऊ शकतो,असा संदेसच दहशतवाद्यांनी दिला.

close