नगरपरिषद निवडणुकाच्या दुसर्‍या टप्प्यात 65 टक्के मतदान

December 13, 2011 4:42 PM0 commentsViews: 2

13 डिसेंबर

सोमवारी लागलेल्या नगरपरिषद निवडणुकात 168 पैकी 132 नगरपालिकेचे निकाल जाहीर झाले त्यापैकी आज 18 नगरपरिषदांसाठी सरासरी 65 टक्के मतदान झाले आहे. आज पुण्यातल्या दौंड, अहमदनगरमधल्या संगमनेर, सातारा, पाचगणी, सांगलीतल्या इस्लामपूर, उस्मानाबाद, तुळजापूर, पारंडा, लातूरमधल्या औसा, अमरावतीतल्या अचलपूर, दर्यापूर, चांदूरबाजार, अकोल्यातल्या अकोट, मूर्तिजापूर, नागपूरमधल्या खापा, कामठी, चंद्रपूरमधल्या बल्लारपूर, सोलापूरमधल्या मैंदर्गी इथं मतदान झालं. तुळजापूर आणि पारंड इथं सर्वाधिक 72 टक्के मतदान झालं आहे.

close