इंदू मिलसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानापुढे घोषणाबाजी

December 13, 2011 11:53 AM0 commentsViews: 5

13 डिसेंबर

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आज अनेक मुद्दे गाजत असताना बाहेर इंदू मिलचा मुद्दा पुन्हा एकदा गाजला. इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीचं निवेदन देण्यासाठी रिपाई नेते राजेंद्र गवई आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी गेले. पण यावेळी पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर रिपाई कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापुढे घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं.

close