अमरावतीमध्ये अपक्ष आमदारांचा बोलबाला

December 14, 2011 8:29 AM0 commentsViews: 10

14 डिसेंबर

राज्यातल्या 42 नगरपालिकांची मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अमरावतीमध्ये मोर्शी येथे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या आघाडीला स्पष्ट बहूमत मिळलं आहे. 19 पैकी 8 जागा जिंकत राणा यांनी ही नगरपरिषद राष्ट्रवादीकडून खेचून आणली आहे. जनसंग्रामला 3 जागा, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 4 जागा मिळाल्या आहे.

अमरावती जिल्हा – 9 जागा आतापर्यंत घोषित – 5 भाजप – 2 , अपक्ष -1 , बच्चू कडू – 1, अनिल बोडे – 1 , रवी राणा -1

अमरावती धामणगावमध्ये भाजपचं वर्चस्व कायम, भाजपनं एकुण 17 पैकी 13 जागा जिंकत बहूमत मिळवलं आहे. तर काँग्रेसला केवळ 4 जागा मिळाल्या आहेत.माजी आमदार अरुणभाऊ अडसड यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनं सत्ता कायम राखली आहे. एकूण 17 जागांपैकी 10 जागा प्रहारने मिळवल्या आहेत. तर राष्ट्रवादीला 4 जागा, भाजप 1, अपक्षांना 2 जागा मिळवल्या आहेत.

अमरावती मध्ये वरुडचे अपक्ष आमदार अनिल बोंडे यांच्या जनसंग्राम आघाडीने जिल्हातील 3 जागी घवघवीत यश मिळवलं आहे. शिवसेनेने विधानसभेचे तिकीट नाकारल्यानंतर बोंडे वरुडमधून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या आघाडीने शेंदुर्जना घाटमध्ये सत्ता मिळवली, तर मोर्शीमध्ये त्यांच्या आघाडीने 3 तर वरुड पालिकेत 4 जागा मिळाल्या आहेत. कापसाला वाढीव हमी भाव मिळावा म्हणून बोंडेनी विदर्भात आंदोलन केलं होते. त्याचाच फायदा त्यांना मिळाला.

close