उस्मानाबाद : कळंबमध्ये काँग्रेसकडून राष्ट्रवादीला धक्का

December 14, 2011 9:13 AM0 commentsViews: 11

14 डिसेंबर

कळंब नगरपालिका काँग्रेसने राष्ट्रवादीकडून खेचण्यात यश मिळविलं आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीला हा धक्का असल्याचं मानलं जातं आहे. 17 पैकी 9 जागी काँग्रेसने विजय मिळविला आहे. तर सत्ताधारी राष्ट्रवादीला फक्त 5 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यंदा सेनेनंही 3 जागा मिळविल्या आहे. काँग्रेस नगरपालिकेतील गटनेते शिवाजी कापसे यांना या विजयाचे शिल्पकार मानलं जातंय. तर राष्ट्रवादीचे खासदार पद्दसिंह पाटील यांनी जातीने लक्ष देऊनही त्यांना सत्ता राखण्यांत अपयश आलं आहे.

त्याचबरोबर मुरुम नगरपालिका पुन्हा एकदा काँग्रेसनं राखली आहे. औसाचे काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार पद्दसिंह पाटील यांनी दिलेलं आव्हान मोडून काढलं आहे. 17 जागांपैकी 15 जागा मिळवून काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. राष्ट्रवादीला फक्त 1 जागी मिळाली तर सेनेलाही एकंच जागा मिळाली आहे.

तुळजापूरला राष्ट्रवादीची सत्ता कायम

उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 33 पैकी 18 जागा जिंकत त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. यापैकी 4 शिवसेनेला,1 भाजपला तर 1 जागा अपक्षांना मिळाली आहे . उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरला राष्ट्रवादीनं सत्ता कायम राखण्यात यश मिळविलं आहे. सर्व 19 जागा जिंकून त्यांनी विरोधक काँग्रेसला व्हाईट वॉश दिला आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे आमदार मधुकरराव चव्हाण यांचा हा मतदारसंघ होता.

भूम नगरपालिकेवर राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व पुन्हा सिध्द केलं आहे. 17 पैकी 12 जागा मिळवून राष्ट्रवादीने सत्ता जिंकली आहे.4 जागा सेनेला तर 1 जागा मिळवुन मनसेनं या नगरपालिकेत आपलं खातं उघडलं आहे.

close