रुपयाची घसरण सुरुच ; जागतिक मंदीचा भारतालाही फटका

December 14, 2011 5:17 PM0 commentsViews: 3

14 डिसेंबर

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किंमतीची घसरण सुरूच आहे. रुपयाचा डॉलरच्या तुलनेतला भाव आज 53 रुपये 75 पैशांवर आला आहे. रुपयाने आतापर्यंतचा निच्चांक गाठला. रुपयाची घसरण ही बाब चिंताजनक असल्याचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमधल्या वेगवेगळ्या क्षेत्रांची प्रगती दाखवणारी आकडेवारी काल प्रसिद्ध झाली होती. ही आकडेवारी गेल्या 28 महिन्यातला सगळ्यात कमी दर दाखवणारी आहे आणि याचाच परिणाम रुपयाच्या दरावर पहायला मिळतोय. घसरणारी अर्थव्यवस्था पाहता परकीय गुंतवणूकदार भारतातून आपला पैसा काढून घेत असल्यानं रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत घसरत चालला आहे. महागाईवर आळा घालण्यासाठी केलेल्या उपाय योजनांचाही हा परिणाम असल्याचे मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बासु यांनी म्हटलं आहे. येत्या महिन्याभरात अन्नधान्याची चलनवाढ तीन टक्क्यांपर्यंत खाली येईल. पण परिणामी आर्थिक विकास दरही घसरेल, असा इशारा बासु यांनी दिला आहे.

close