भाजपचे आणखी 2 आमदार निलंबित

December 15, 2011 9:50 AM0 commentsViews:

15 डिसेंबर

धानाची पेंडी जाळल्या प्रकरणी भाजपच्या अजून दोन आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. पाशा पटेल आणि केशव मानकर या विधानपरिषदेचे सदस्य असणार्‍या दोन्ही आमदारांना त्यांच्या उर्वरीत कार्यकाळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यापुर्वी भाजपचे आमदार नाना पटोले यांच्यावर निंलबनाची कारवाई करण्यात आली होती. या आमदारांनी विधिमंडळ आवारात धानाच्या पेंड्या जाळल्या होत्या. संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी याविषयीचा निलंबनाचा प्रस्ताव मांडला. तर विधान परिषदेचे सभापती वसंत डावखरे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.

close