मालवण नगरपरिषदेवरुनही उतरणार काँग्रेसचा झेंडा ?

December 15, 2011 9:53 AM0 commentsViews: 1

15 डिसेंबर

सावंतवाडी आणि वेंगुर्ले नगरपरिषदेतल्या पराभवानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी, एकमेव आशा असलेल्या मालवण नगरपरिषदेवरुनही काँग्रेसचा झेंडा उतरण्याची शक्यता आहे. निवडून आलेले अपक्ष नगरसेवक महेश गावकर यांनी राष्ट्रवादीच्या गटातून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्यामुळे नारायण राणेंच्या सत्ता स्थापन करण्याच्या इराद्याला आवाहन उभं राहलं आहे. मात्र त्याचबरोबर काँग्रेसकडून राणे समर्थक सुदेश आचरेकर यांनीही नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येत्या 19 तारखेला मालवणात कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल.

close