गोसीखुर्द प्रकल्पाची सीबीआय चौकशी करा – वड्डेटीवार

December 14, 2011 2:29 PM0 commentsViews: 4

14 डिसेंबर

राज्यातला एकमेव राष्ट्रीय जलसिंचन प्रकल्प असलेल्या गोसी खुर्द प्रकल्पामध्ये एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. अर्थ संकल्पीय तरतूद नसताना देखील वाढीव रक्कमेचे टेंडर काढण्यात आले आहे. हा सर्व घोटाळा कॅगच्या लक्षात आल्यामुळे कॅगने गोसी खुर्द प्रकल्पाच्या विरोेधात अहवाल सादर केला. त्यामुळे केंद्र सरकारने यंदा गोसीखुर्द प्रकल्पाला निम्मिच रक्कम अदा केली आहे. गोसीखुर्द प्रकल्पाप्रमाणेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या इतर जल सिंचन प्रकल्पांमध्येही मोठ्या रक्कमेचा अपहार झाला आहे. त्यामुळे गोसी खुर्दसह विदर्भातील सर्व जलसिंचन प्रकल्पाच्या कामाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार विजय वड्डेटीवार यांनी विधानसभेत केली. सत्ताधारीच आमदाराने सीबीआय चौकशीची मागणी केल्यामुळे राज्य सरकारची पंचाईत झाली आहे.

close