झिपरू मुकणे हत्याप्रकरणाची होणार सीआयडी चौकशी

December 14, 2011 2:34 PM0 commentsViews: 2

14 डिसेंबर

ठाणे जिल्ह्यातील रामदास शंकर वळवी आणि झिपरू मुकणे या दोन आदिवासी वेठबिगार कामगारांच्या हत्येप्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे. वीटभट्टी मालक बाळू चौधरी यानं झिपरू मुकणे यांची 21 नोव्हेबरला हत्या केली होती. फक्त 6 हजार रुपयाचे कर्ज त्याने परत केलं नसल्याने त्याचा अमानुष छळ करुन त्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर प्रसार माध्यमांनी हा विषय उचलून धरला होता. तर रामदार वळवी याची काही दिवसांपुर्वी हत्या करण्यात आली होती. हायकोर्टानेे मीडियातील आलेल्या बातम्यांची दखल घेत स्वताहून याचिका दाखल करुन सीआयडी चौकशीचे आदेश राज्य सरकारला दिले आहे.

close