खडसेंच्या गैरहजरीमुळे ‘राईट टू रिप्लाय’वरुन गोंधळ

December 14, 2011 2:42 PM0 commentsViews: 4

14 डिसेंबर

विधानसभेमध्ये कापूस, सोयाबिन आणि धानाच्या प्रश्नावरील चर्चा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उपस्थीत केली होती. त्यानाच सरकारच्या उत्तरानंतर राईट टू रिप्लाय च्या माध्यमातून सरकारच्या निवेदनातील त्रुटीवर बोट ठेवण्याचा अधिकार असतो. पण नगर पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे अचानक भुसावळला गेले. त्यांच्या गैरहजेरीत राईट टू रिप्लाय कुणी मागायचा याबाबत गोंधळ निर्माण झाला. खडसे यांच्या गैरहजेरीत विरोधी बाकावरच्या अन्य नेत्याला हा अधिकार नाकारण्यात आला. त्यामुळे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे भुसावळला का गेले आणि त्यांनी आपल्या गैरहजेरीत दुसर्‍या नेत्याला हा अधिकार दिला होता का ? तसेच सरकारने राईट टू रिप्लाय इतर नेत्यांना का नाकारला असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

close