मतदारांना खूष करण्यासाठी उमेदवारांची स्टंटबाजी

December 15, 2011 12:49 PM0 commentsViews: 4

15 डिसेंबर

पुण्यामध्ये सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याचं पक्षांची चढाओढ सुरु आहे ती मतदारांना खूष करण्याची. यासाठीच सध्या होम मिनिस्टर सारख्या कार्यक्रमापासून ते तिर्थयात्रेपर्यंत अनेक कार्यक्रमांचे आयोजन इच्छुक उमेदवार करताना दिसत आहे. पण असल्या कार्यक्रमांपेक्षा विकासकाम करा अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.

कुठे रंगलाय पैठणीचा खेळ.. तर कुठे भरलीये बालजत्रा.. कोणी लोकांना देवदर्शनाला घेऊन जातं आहे. तर कोणी लिटील चॅम्पस, लावणी महोत्सव अशा कार्यक्रमाचं आयोजन करतं आहे. हे इथंच थांबत नाही तर लकी ड्रॉचंही आयोजन केलं जातं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमांची बक्षीसही साधीसुधी नाही. लकी ड्रॉचं पहीलं बक्षीस आहे टाटा नॅनो कार..

नागरिकांची मदत करणं हे तर या सगळ्याचं कर्तव्यच. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला.. मोफत पॅन कार्ड मिळवून देणारे स्टॉल्सही ठिकठिकाणी दिसत आहे. मतदार राजाला खूष करण्यासाठी सध्या पुण्यात सगळीकडे अशा कार्यक्रमांची स्पर्धा सुरू आहे.

नगरसेवक शैलेश चरवड म्हणतात, एकानी केलं की आम्हांला पण करावंच लागतं.

या कार्यक्रमांची माहिती देणार्‍या फ्लेकसचीही एक वेगळी जत्राच यानिमित्ताने पहायला मिळत आहे. आंदोलनांचीही माहिती फ्लेक्सवर झळकवली जातेय..या सगळ्या कामांना पैसा आला कुठून असा प्रश्न नागरिकांना पडतोय. कार्यक्रम करून, गिफ्ट्स देऊन मतदार राजा खूष होईल का याचं उत्तर मतदानानंतरच स्पष्ट होईल.

close