स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण जागा देण्याचा सरकारचा नकार

December 14, 2011 5:14 PM0 commentsViews: 3

14 डिसेंबर

मुंबईतल्या इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळावी या मागणीसाठी गेल्या 9 दिवसांपासून रिपब्लिकन नेते आणि भीमसैनिक आंदोलन करत आहे. पण, या नेत्यांच्या अपेक्षेवर केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्र्यांनी पाणी फेरले आहे. स्मारकासाठी संपूर्ण 12 एकर जागा देणं शक्य नसल्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पी. लक्ष्मी यांनी आज राज्यसभेत सांगितलं. फक्त 4 एकर जागा देण्यावर विचार होऊ शकतो, असं लक्ष्मी यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडरांच्या स्मारकाला देण्यासाठी सरकार गंभीर नाही, असा आरोप आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केला. ही जागा देण्याचा निर्णय झाला नाही तर उद्या चैत्यभूमीवर भव्य मोर्चा नेणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

close