कर्नाटक सरकारने केली बेळगाव महापालिका बरखास्त

December 15, 2011 1:19 PM0 commentsViews: 2

15 डिसेंबर

अखेर कर्नाटक सरकारने बेळगाव महानगरपालिका बरखास्त केली आहे. कर्नाटकचे नगररविकास मंत्री सुरेश कुमार यांनी विधानसभेत याबद्दलची अधिकृत घोषणा केली. बेळगाव महापालिकेवर आता प्रशासक नेमण्यात येणार आहे. 1 नोव्हेंबर 2011 रोजी बेळगावच्या महापौर आणि उपमहापौरांनी काळ्या दिनाच्या सायकल फेरीत भाग घेतला होता. त्यावर चिडलेल्या कर्नाटक सरकारने महापौर मंदा बाळेकुंद्री आणि उपमहापौर रेणू किल्लेकर यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. त्यात 20 प्रश्नांवर स्पष्टीकरण मागितलं होतं. पण, त्यावर समाधानकारक उत्तर दिलं नसल्याचे कारण देत कर्नाटक सरकारने महापालिका बरखास्त केली. बेळगाव महापालिकेचा कारभार आता प्रशासकाच्या हातीयेण्यापूर्वी 2005 मध्ये बेळगाव महापालिकेत मराठी महापौर आणि उपमहापौर असताना तत्कालीन धरमसिंह सरकारने अशा प्रकारची कारवाई केली होती.

close