राजकारणाचा गुणी खेळाडूंना फटका

December 15, 2011 3:02 PM0 commentsViews: 11

मनोज देवकर, ठाणे

15 डिसेंबर

खेळ म्हटलं की राजकारण हे आलंच… पण काही वेळा या राजकारणाचा फटका गुणी खेळाडूंनाही बसतो. याचाच अनुभव सध्या घेतेय ठाणे कबड्डी टीमची कॅप्टन अव्दैता मांगले. यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करुनही तिला महाराष्ट्राच्या महिला कबड्डी टीममधून वगळण्यात आलं आहे.

महाराष्ट्राच्या कबड्डीची संघ निवड वादात सापडली आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करूनही ठाण्याच्या अव्दैता मागलेला यंदा मात्र टीममधून वगळण्यात आलंय. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्याची कॅप्टन असणार्‍या अद्वैताची यंदाच्या हंगामात कामगिरीही चागंली झालीय. आपल्यावरील या अन्यायाविरोधात तीने आता आवाज उठवला आहे.

गेली 5 वर्ष ठाण्यासह मुंबई विद्यापीठाच्या कबड्डी स्पर्धा गाजवणार्‍या अद्वैतावरील अन्यायाची दखल खुद्द ठाण्याचे महापौर अशोक वैती यांनी घेतली. राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना त्यांनी यासंदर्भात एक पत्र लिहलं आहे. अद्वैताला जर न्याय मिळाला नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

येत्या 4 ते 8 जानेवारी दरम्यान मुंबईतराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार आहे. संघ निवडीचा हा वाद जर न्यायालयात गेला तर स्पर्धा आयोजनाला त्याचा फटका बसू शकतो अशी भीती कबड्डी संघटक व्यक्त करत आहेत.आता अद्वैतावरील अन्याय दुर करण्यासाठी कबड्डी संघटना प्रयत्न करणार का हा खरा प्रश्न आहे.कबड्डीचा संघसुवर्णा बारटक्के (मुंबई शहर)दीपिका जोसेफ (पुणे)सोनाली इंगळे (पुणे)हर्षला मोरे (ठाणे)स्नेहल शिंदे (पुणे)नेहा घाडगे (पुणे)आरती नागवेकर (मुंबई शहर)अश्विनी राऊत (ठाणे)पूजा किणी (मुंबई उपनगर)रुबिना शेख (सातारा)स्नेहल साळुंखे (मुंबई शहर)प्रमोदिनी चव्हाण (मुंबई उपनगर)

close