राज्याचा आर्थिक विकास दर खाली आला

November 19, 2008 2:45 PM0 commentsViews: 5

19 नोव्हेंबर मुंबई आशिष जाधवपरकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन बनला आहे. पण जागतिक मंदीमुळे राज्याचा औद्योगिक विकास दर मात्र पाच टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे औद्योगिक उत्पादन कमी होण्याबरोबरच अनेकांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळणार हे आता स्पष्ट झालं आहे.राज्यातल्या मोठ्या आणि मेगा प्रकल्पांमध्ये 5 लाख 82 हजार 897 कर्मचारी काम करत आहेत. तर लहान आणि मध्यम प्रकल्पांमध्ये 10 लाख 86 हजार 111 कर्मचारी कार्यरत आहेत. या औद्योगिक क्षेत्रातल्या एकूण 16 लाख 70 हजार कर्मचा-यांपैकी अनेकांवर आपल्या नोक-या गमावण्याची वेळ येणार आहे.राज्याच्या औद्योगिक विकास दरात मोठी घसरण झाल्याचं उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांनी मान्य केलं आहे. जागतिक मंदीमळे राज्यातलं औद्योगिक उत्पादन घटत आहे. सर्वाधिक झळ लहान-मोठ्या उद्योगांना बसत आहे. तसंच एमआयडीसीच्या अनेक प्रकल्पांमध्ये कामाचे तास अर्ध्यावर आले आहेत. तसंच निर्माण अवस्थेत असलेल्या तीनशेहून अधिक प्रकल्पांचं काम रखडण्याची शक्यता आहे.

close