इंदू मिलच्या जागेसाठी डेक्कन रोखली

December 15, 2011 4:23 PM0 commentsViews: 3

15 डिसेंबर

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळावी यासाठी पुण्यामध्ये आज रेल रोको करण्यात आलं. पुण्याहुन मुंबईकडे जाणारी डेक्कन एक्सप्रेस आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी रोखुन धरली. जवळपास अर्धा तास ही रेल्वे रोखुन धरण्यात आली होती. यावेळी आरपीआयचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे स्टेशनवर हा रेल रोको करण्यात आला. एकीकडे हा रेल रोको होत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातले खासदार ही जागा मिळण्यासाठी काहीच प्रयत्न करत नसल्याचा निषेध म्हणून कलेक्टर ऑफिसवर आंदोलन करण्यात आलं. यावेळी सर्व खासदारांना साडीचोळी आणि बांगड्यांचा आहेर पाठवण्यात आला. रिपब्लिकन सेनेतर्फे पुण्यातल्या कलेक्टर ऑफिसवर हे आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्येही आरपीई आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात आंदोलन केली, पिंपरीतील आंबेडकर चौकात रिपब्लिकन सेनच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले,तर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली, या दोन्ही आंदोलनामुळे मुंबई-पुणे माहामार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबली होती, आंदोलन करणा-यांपैकी 20 कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

close