जनावरांना सरकार चारा देणार का ? दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचा संतप्त सवाल

December 16, 2011 2:40 PM0 commentsViews: 16

16 डिसेंबर

सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी चार्‍यासाठी सरकारने थेट शंभर टक्के अनुदान द्यावे या मागणीसाठी गेल्या अकरा दिवासापासून दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांनी आपल्या जनावरांसह आटपाडी तहसिलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.पाऊस नाही आणि सिंचनाची कोणतीच सोय नाही त्यामुळे या दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍याचे खरीप आणि रबी हे दोन्हीही हंगाम वाया गेले आहे. त्यात सरकारने चारा डेपो उघडुन शेतकर्‍यांना या चार्‍यासाठी 50 टक्के अनुदान देण्याचं जाहीर केलं. पण दोन्ही हंगामातील पिकं वाया गेल्याने पैसा कुठुन आणायचा असा प्रश्न या शेतकर्‍यांना पडला आहे. त्यामुळे पाणी संघर्ष चळवळीच्या माध्यमातून हे सगळे शेतकर्‍यांनी डॉ.भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु केलं आहे. जो पर्यंत सरकार 100 टक्के अनुदान देत नाही तोपर्यत तहसिलदार कार्यालयासमोरुन जणावरांना घेवून उठणार नाही असा निर्णय इथल्या शेतकर्‍यांनी घेतला आहे.

close