पु.ल.स्मृती पुरस्कार नाना पाटेकर यांना प्रदान

December 16, 2011 4:00 PM0 commentsViews: 10

16 डिसेंबर

यंदाचा पु.ल.स्मृती पुरस्कार अभिनेते नाना पाटेकर यांना प्रदान करण्यात आला. पुण्यात आज पुलोत्सव 2011 चं उद्घाटन झालं. विजया मेहता यांच्या हस्ते हा पुरस्कार नानांना प्रदान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार आर. के. लक्ष्मण आणि त्यांच्या पत्नी कमला लक्ष्मण यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आर के लक्ष्मण यांचा विजया मेहता यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात नाना पाटेकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली या मुलाखती अण्णा हजारेंसारख्या माणसांवर आंदोलन करण्याची वेळ का येते? असा सवाल ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी उपस्थित केला. अनेक लोक मोठ्या पदांवर जाऊन बसले आहेत. लायकी नसताना त्यांना पदं मिळतात. त्यांना ओरबाडुन खाली खेचलं पाहिजे असं नाना यावेळी म्हणाला. नानाची खास मुलाखत घेण्यात आली त्यावेळी तो बोलत होता. अशा पदांवर बसलेल्या माणसांसाठी आपण काय करतो आणि जी खरंच चांगली आहे अशा बाबा आमटेंसारख्या माणसांसाठी काही करत नाही असं नाना यावेळी म्हणाला.

close