देवनार येथे केमिकलचा टँकर उलटला

December 16, 2011 4:05 PM0 commentsViews: 1

16 डिसेंबर

देवनार पांजरापोळ इथं शिवाजी चौकात स्टर्लिंग केमिकलने भरलेला टँकर रस्त्यावर उलटल्याने टँकरमधील केमिकल रस्त्यावर पसरले परिणामी शिवाजी चौकातील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी उलटलेला केमिकल टँकर रस्त्यावरुन बाजूला केला तसेच 20 ते 25 कर्मचार्‍यांनी रस्त्यावर पसरलेलं केमिकल साफ केलं. त्यानंतर शिवाजी चौकातील वाहतूक सुरळीत झाली. शिवाजी चौकात केमिकल टँकर उलटण्याची ही तिसरी घटना असून या चौकात अवजड वाहनांची होणार्‍या वाहतुकीमुळे हा चौक लोकांसाठी धोकादायक असल्याचे लोकांचे म्हणण आहे.

close