इंदू मिल तोडफोड प्रकरणी आठवलेंविरोधात गुन्हा दाखल

December 16, 2011 4:13 PM0 commentsViews: 7

16 डिसेंबर

इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी काल गुरुवारी परवानगी नसतानाही मिलवर मोर्चा काढला तसेच मिलमध्ये कार्यकर्त्यांनी तोडफोड आणि जाळपोळ केली होती. याप्रकरणी रामदास आठवले यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या आंदोलनात हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. पोलीस दलाकडून वारंवार सुचना देऊन सुध्दा कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. अखेर आज पोलिसांनी आठवलेंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

close