पुण्यात ‘ओ रिक्षा..sss’,म्हणण्यापेक्षा आता ‘हॅल्लो रिक्षा’

December 16, 2011 4:39 PM0 commentsViews: 5

16 डिसेंबर

कुठेही जायचं म्हणलं की किमान चार रिक्षा तरी शोधाव्या लागणं.. रिक्षा स्टॅण्डवर रिक्षावाल्यांनी भाडं नाकारणं हा सर्वसाधारणपणे येणारा अनुभव.. मुंबईमध्ये तर या रिक्षावाल्यांच्या मुजोरीविरोधात आंदोलनही झालं. पण आता मात्र या पुणेकरांची या सगळ्या प्रकारापासून काही प्रमाणात का होईना सुटका होणार आहे. रिक्षा हवी असेल तर तुम्हांला करायचा आहे फक्त एक फोनकॉल.. पुण्यामध्ये 'डायल ए रिक्षा' हा नवीन उपक्रम सुरु झाला आहे. तुम्हाला हवी तेव्हा आणि हवी तिथे या माध्यमातून रिक्षा बोलावु शकता. आयआयटी ग्रॅज्युएट असणार्‍या दोन तरुणांनी हा उपक्रम सुरु केला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. जर तुम्हाला रिक्षा हवी असेल तर फक्त 66111111 या नंबरवर फोन करायचा आहे. या सर्व्हीससाठी काम कऱणार्‍या रिक्षावाल्यांपैकी जो सगळ्यात जवळ असेल त्याची रिक्षा लगेचच पाठवण्यात येईल. त्याबरोबरच तुमच्या नंबरवर अंदाजे किती रक्कम खर्च करावी लागणार आहे याचीही अंदाजे रक्कम एसएमएस मार्फत पाठवण्यात येणार आहे. अर्थात या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर ज्यादाचे 15 रुपये मात्र मोजावे लागणार आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना या सुविधेसाठी 20 टक्के डिस्काउन्टही देणार आहे.

close