बाबा रामदेव यांच्या आंदोलनावरील कारवाई पूर्वनियोजित

December 16, 2011 5:28 PM0 commentsViews: 3

16 डिसेंबर

दिल्लीत बाबा रामदेव यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी मध्यरात्री केलेली कारवाई ही पूर्वनियोजित होती, अशी साक्ष ऍमिकस क्युरीने आज दिली. बाबा रामदेव यांनी काळ्या पैशाविरोधात जून महिन्यात दिल्लीतल्या रामलीला मैदानावर उपोषण सुरु केलं होतं. पण त्याच दिवशी मध्यरात्री पोलिसांनी लाठीमार करत हे आंदोलन उधळून लावलं होतं. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. राजकीय फायद्यासाठी ही कारवाई केल्याचे आज ऍमिकस क्युरीने सुप्रीम कोर्टात सांगितले. ज्या वेळी बाबा रामदेव यांना अटक करण्यात आली, त्यावेळी ते कुठल्याच प्रकारचं चिथावणीखोर भाषण करत नव्हते, त्यामुळे लाठीचार्ज करण्याची गरज नव्हती असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच कारवाईदरम्यान दिल्ली पोलीस सतत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संपर्कात होते असंही त्यांनी सांगितले. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी बाबा रामदेव यांची खास मुलाखत घेतली होती. त्यात माझ्यासह हजारो आंदोलकांच्या हत्येचा कट होता, असा आरोप बाबा रामदेव यांनी सांगितलं होतं. ऍमिकस क्युरीच्या आजच्या साक्षीमुळे रामदेव यांच्या आरोपाला बळ मिळालं आहे.

close