‎’फेसबुक’मुळे काँग्रेसच्या नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड

December 16, 2011 12:42 PM0 commentsViews: 2

16 डिसेंबर

पुणे महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आबा बागुल यांच्या कॅबिनची तोडफोड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच ही तोडफोड केली आहे. आबा बागुल यांच्या फेसबुक प्रोफाईलवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी कसाबला पेढे भरवत असतानाचा फोटो कुणीतरी टॅग केला होता. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बागुल यांच्या कॅबिनची तोडफोड केली. या घटनेमागे राजकारण असल्याचा आरोप आबा बागुल यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आबा बागुल यांच्या वॉर्डमध्ये अनेक विकास कामं आणि नवीन प्रकल्प साकार झाले आहेत. यातल्याच फोर डी थिएटरचे उद्घाटन उद्या शर्मिला टागोर यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे राजकीय सुडापोटी काँग्रेसच्या त्यांच्याच वॉर्डमधल्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली असल्याचा आरोप आबा बागुल यांनी केला आहे.

close