2 जी प्रकरणात चिदंबरम गुन्हेगार – स्वामी

December 17, 2011 9:19 AM0 commentsViews: 2

17 डिसेंबर

2जी प्रकरणी जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांची विशेष सीबीआय कोर्टात साक्ष झाली. पतियाळा हाऊस कोर्टात आज या प्रकरणी सुनावणी झाली. चिदंबरम आणि ए राजा हे दोघंही 2 जी प्रकरणात तितकेच गुन्हेगार आहेत असा आरोप याचिकाकर्ते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला. आता यापुढची सुनावणी 7 जानेवारीला होणार आहे. सुब्रमण्यम स्वामींनी ज्या कागदपत्रांचा हवाला दिला त्यांची सत्यता आता पडताळून पाहिली जाणार आहे. कोर्टाने यासाठी संसदेत आणि संबंधित खात्याकडून कागदपत्रं मागवली आहेत. चिदंबरम यांच्याविरोधात समन्स बजावण्यासंदर्भात आपण कोर्टात अपील करणार असल्याचं स्वामी यांनी सांगितले आहे.

close