बरखास्तीच्या विरोधात निपाणी बंदची हाक

December 17, 2011 10:02 AM0 commentsViews: 3

17 डिसेंबर

कर्नाटक सरकारने बेळगाव महापालिका बरखास्त केली आणि त्याचे पडसाद राज्यभरात आजही पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडजवळ पाटने फाटा इथं आज मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी कर्नाटक परिवहन मंडळाची एका बसवर दगडफेक केली आणि बसच्या काचा फोडल्या. तर बेळगाव महापालिका बरखास्ती विरोधात आज महाराष्ट्र एकीकरण समितीने निपाणी बंद पुकारला आहे. कर्नाटक सरकार ब्रिटीशांपेक्षाही जुलमी आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया बेळगावमध्ये राहणारे मराठी भाषिक देत आहे. दरम्यान, कालही कोल्हापुरात मनसेनं कर्नाटक परिवहनच्या बसेसची तोडफोड केली. आणि राज्यसरकारने महापालिका स्थगितीचा प्रस्ताव रद्द करण्यासंबंधीचा ठराव काल विधानसभेत एकमताने मंजूर झाला.

close