चिमुकलीच्या पोटात भ्रूण आढळले

December 17, 2011 8:02 AM0 commentsViews:

17 डिसेंबर

ठाण्याच्या कौशल्या हॉस्पिटलमध्ये एक वेगळी शस्त्रक्रिया करण्यात आली. यात एका दोन महिन्याच्या मुलीच्या पोटातून एक भ्रूण काढण्यात आलं आहे. इशिता असं या छोट्या मुलीचं नाव आहे. जन्मापासूनच तिला पोटदुखीचा त्रास होत होता. म्हणून तिला कौशल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सोनोग्राफी केल्यानंतर पोटात भ्रूण असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर ऑपरेशन करुन काढण्यात आलं. तीच्या जन्माच्या वेळी तीच्या आईच्या पोटात आणखी एक भ्रूण होतं. पण त्याचा विकास झाला नाही आणि ते इशिताच्या पोटात गेल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. अशाप्रकारची ही जगातली 94 वी घटना आहे. तर भारतात अशा प्रकारची चार ऑपरेशन्स करण्यात आले आहे.

close