कांजुरमार्ग येथील कंपनीत घुसला बिबट्या

December 17, 2011 11:07 AM0 commentsViews: 7

17 डिसेंबर

आज शनिवारी सकाळी मुंबईतल्या कांजुरमार्ग मधल्या जॉली बोर्ड कंपनीत अचानक बिबट्या घुसला. त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. वनखात्याला याबाबत तातडीने माहिती देण्यात आली. बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी वनखात्याची रेस्क्यु टीम रवाना झाली. आतापर्यंत या बिबट्याने कोणालाही जखमी केलं नसल्याची माहिती वन अधिकार्‍यानी दिली. आतापर्यंत नॅशनल पार्कमधले बिबटे जंगलाच्या आजुबाजुला वावरताना आढळले होते. पण आज हा बिबट्या जंगलाच्या हद्दीपासून सात किमी लांब असलेल्या कंपनीत कसा काय आला. असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

close