बेकायदेशीर मंदिरांवर गुजरातमध्ये कारवाई

November 19, 2008 6:03 PM0 commentsViews: 14

19 नोव्हेंबर, गुजरात गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये मोदी सरकारनं सध्या बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. यात बेकायदेशीर बांधकामं असलेली मंदिरंही पाडण्यात आली आहेत.गांधीनगरमधील एक साईबाबा मंदिर बुलडोझरनं पाडल्यानं नाराज झालेली जनता आज रस्त्यावर उतरली. आतापर्यंत शहरातली 350 अनधिकृत बांधकामं पाडण्यात आलीत. ही मोहीम हाती घेण्याआधी करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये 107 मंदिरं मुख्य रस्त्यावर तर 312 मंदिरं मुख्य रस्त्यापासून आत असल्याचं लक्षात आलं आहे.

close