अजित सिंग यांनी कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतली

December 18, 2011 8:04 AM0 commentsViews: 4

18 डिसेंबर

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज पुन्हा विस्तार झाला आहे. राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंग यांनी कॅबिनेट मंत्रीपदी आज शपथ घेतली. राष्ट्रपती भवनामध्ये हा मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम झाला. अजित सिंग यांची उत्तरप्रदेशात काँग्रेसला साथ मिळाली. ते युपीएमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. अजित सिंग यांना हवाई वाहतूक मंत्रालयाला मिळण्याची शक्यता आहे.

close