अशोक लांडे हत्या प्रकरणी आ.शिवाजी कर्डीलेंना अटक

December 17, 2011 2:36 PM0 commentsViews: 52

17 डिसेंबर

अशोक लांडे या व्यावसाईकाची अहमदनगरमध्ये 2008 ला अंतर्गत वादातून हत्या झाली होती. या प्रकरणामध्ये आता आमदार शिवाजी कर्डीलेंना अटक करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात माजी महापौर संदीप कोटकर, त्यांचे तीन भाऊ आणि वडिल भानुदास कोटकर यांच्यावर कलम 302 च्या अंतर्गत गुन्हा दाखल होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी पैशाची देवाणघेवाण केल्याचा आणि पुरावे नष्ट केल्याचा अरोप आमदार शिवाजी कर्डीले यांच्यावर होता. त्यातूनच ही अटक झाली. याआधी डॉ. कांकरीया जमीन हडप फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या कर्डीलेंवर आता हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

close