ली सुपर सीरिजमध्ये सायनाची फायनलमध्ये धडक

December 17, 2011 2:56 PM0 commentsViews: 1

17 डिसेंबर

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने ली निंग सुपर सीरिजच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनमलध्ये तिने डेन्मार्कच्या टीने बॉनचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये आक्रमक खेळ करत तिने हा सेट 21-17 असा जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये बॉनने थोडीफार लढत दिली खरी पण हा सेटही सायनाने 21-18 असा जिंकत मॅच खिशात घातली. आता फायनलमध्ये सायनाची गाठ पडणाराय ती नंबर वन असलेल्या इयान वंॅगशी. या स्पर्धेची फायनल गाठणारी सायना ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.

close