ग्रामस्थांच्या मदतीने अवैध डिझेल साठा जप्त

December 18, 2011 3:05 PM0 commentsViews: 2

18 डिसेंबर

अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड नंतर डिझेल आणि पेट्रोलच्या अवैध धंद्यांविरुध्द आता सर्वसामान्य नागरिकही उतरले आहे. चांदवडजवळ पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने एका घरावर छापा मारुन मोठ्या प्रमाणावर डिझेलचा अवैध साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

मुंबई आग्रा हायवे वर एका घरात गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचा अवैध धंदा सुरु असल्याची माहिती मधुकर देवरे या जागरुक नागरिकाने पोलिसाना दिली. आणि या माहितीची पोलिसानीही तितक्याचे तातडीने दखल घेतली. आणि छापा टाकून डिझेलचा मोठा साठा जप्त केला. यात डिझेलने भरलेल्या जवळपास 50 कॅन्स आणि 6 ड्रम चा समावेश आहे.

हा साठा पूर्णपणे अनधिकृत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही डिझेलची चोरी असून, या प्रकरणात अजून कुणा कुणाचे हितसंबंध आहे याचा तपास आता पोलीस करत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे हे मध्यप्रदेशातील काही व्यापार्‍यांपर्यंत पोहोचत असल्याचंही पोलिसांकडून समजते. या प्रकरणात भिला दत्तु दगा या विंचावे गावातील स्थानिक व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

close