सलाम बॉम्बे फाऊंडेशनची तंबाखू विरुद्धची मोहिम

November 19, 2008 6:26 PM0 commentsViews: 50

19 नोव्हेंबर मुंबई राजानंद मोरे खेळाडूंना तंबाखूपासून दूर ठेवण्याच्या उद्देशानं सलाम बॉम्बे फाऊडेशननं एक विशेष मोहिम हाती घेतली आहे. स्पोर्टस अगेस्ट टोबॅको या नावानं ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. यानिमित्तानं मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसाठी एका क्रिकेट मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं. ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मॅचमधे सचिन तेंडुलकर किंवा भारतीय टीमचा कोणताही खेळाडू खेळत नव्हता. ही मॅच खेळवली गेली एका खास उद्देशाने, तंबाखूपासून दूर रहा असा संदेश देण्यासाठी. तंबाखू को करो क्लीन बोल्ड हा संदेश देणारे टी शर्ट घालून मुंबई महानगर पालिका शाळेतील 5 ते 6 हजार विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते. स्पोर्टस अगेन्स्ट टोबॅको या मोहिमेचं आयोजन करून सलाम बॉम्बे फाऊंडेशननं या मुलांबरोबरच संपूर्ण देशालाच तंबाखू मुक्तीचा संदेश दिला आहे.

close