विधानसभेत 5 सत्ताधारी आमदार एका दिवसासाठी निलंबित

December 19, 2011 9:40 AM0 commentsViews: 2

19 डिसेंबर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची सर्व जागा महिन्याभरात द्यावी असा ठराव एकमताने राज्य सरकारने विधानसभेत मांडावा अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली. त्यासाठी सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत फलक फळकावले आणि जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे चंद्रकांत हंडोर, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, शशकांत शिंदे आणि प्रशांत ठाकूर या पाच सत्ताधारी आमदारांना एक दिवसाठी निलंबित करण्यात आलं आहे. या आमदारांनी बाहेर येऊन विधानभवनाच्या पायर्‍यांवर पुन्हा घोषणाबाजी केली. पण इंदू मिलप्रकरणी सत्ताधार्‍यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी बेगडीप्रेम व्यक्त केल्याची टीका विरोधकांनी केली.

close