पोलीस भरतीची सीबीआय चौकशीची अपात्र उमेदवारांची मागणी

December 18, 2011 11:05 AM0 commentsViews: 3

18 डिसेंबर

रायगडमधल्या 378 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. याविरोधात अपात्र ठरलेली मुलं गेली चार दिवस आंदोलन करत आहेत. संशयास्पद झालेल्या पोलीस भरतीची सीबीआय चौकशी व्हावी अशी या मुलांची मागणी आहे. या मागणीसाठी अपात्र मुलांनी जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक दिली. पण त्यांना सरकारकडून अजून कोणतंच आश्वासन मिळालेलं नाही. दरम्यान, पोलीस भरती नियमांनुसारच झाल्याचे रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर डी शिंदे यांनी म्हटलं आहे.

close