मुलाचा खड्‌ड्यात पडून मृत्यू ;जिल्हाधिकार्‍यांच्या अटकेची मागणी

December 18, 2011 4:25 PM0 commentsViews: 2

19 डिसेंबर

मुंबईतल्या विक्रोळी इथल्या कन्नमवार नगरमध्ये असणार्‍या भीमछाया झोपडपट्टीतील उदय मोहिते या सामाजिक कार्यकर्त्यांने गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. 16 नोहेंबरला कलेक्टरच्या आदेशानुसार इथल्या झोपड्या अनधिकृत आहेत असं सांगत त्या पाडण्यात आल्या, आणि पुन्हा लोकानी त्याठिकाणी झोपड्या उभारू नये म्हणून त्याठिकाणी मोठे मोठे चर खोदले गेले आहेत.

आणि याच चरात पडून जयेश मोहिते या दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कलेक्टर निर्मलकुमार देशमुख आणि उपजिल्हाधिकारी दावभट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. पण जोपर्यंत या दोघांना अटक होत नाही तोपर्यंत मृत पावलेल्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मुलाच्या नातेवाईकांनी घेतली आहे. या घटनेला आज सात दिवस झाले आहेत. मुलाचा मृतदेह राजवाडी हॉस्पिटलमध्ये तसाच आहे. तर उदय मोहितेंचे उपोषणही सुरुच आहे.

close