इंदू मिलच्या जागेसाठी राज्यभरात आरपीआयची रेल रोको

December 19, 2011 11:09 AM0 commentsViews: 4

19 डिसेंबर

इंदू मिल जमीन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी आरपीआय कार्यकर्त्यांनी आज राज्यभरात रेल रोको आंदोलन सुरु केलं आहे. मुंबईत भांडूप, डोंबिवली स्टेशनवर आरपीआय कार्यकर्त्यांनी सीएसटी कडे जाणारी लोकल रोखून धरली. रामदास आठवलेंवरचे गुन्हे मागे घ्या आणि इंदू मिलची संपूर्ण 12 एकर जागा डॉ.आंबेडकर यांच्या स्मारकासाठी द्या अशा घोषणा देत या कार्यकर्त्यांनी रेल रोको केलं. तर नवी मुंबईत कोपरखैरणे इथं वाशी-ठाणे मार्गावरची वाहतूक कार्यकर्त्यांनी ठप्प केली. तसेच अंबरनाथमध्येही रेल रोको करण्यात आलं. सीएसटीकडे जाणारी लोकल रोखण्यात आली. तर दुसरीकडे सोलापूरमध्येही आरपीआय कार्यकर्त्यांनी एक्सप्रेस गाड्या अडवल्या. तर परभणीत रिपाई आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल अर्धा तास तपोवन एक्सप्रेस रोखून धरली होती. इंदू मिलची जागा मिळालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून सोडला. परभणी रेल्वे स्टेशनच्या जवळच्या उड्डाणपूलाजवळ हे आंदोलन केलं.

close