सचिन वन डेसाठी सज्ज झाला

November 19, 2008 8:04 PM0 commentsViews: 3

19 नोव्हेंबरक्रिकेट फॅन्ससाठी खूश खबर. सचिन वन डेसाठी सज्ज झाला आहे. तब्बल 8 महिन्यानंतर सचिन वन डे खेळणार आहे.सचिनचा अपवाद वगळता इंग्लंडविरुध्दच्या पुढच्या चार वन डे मॅचसाठी भारतीय टीममध्ये विशेष बदल अपेक्षित नाहीत. ऑस्ट्रेलियातील तिरंगी वन डे स्पर्धेच्या फायनलमध्ये सचिन शेवटची वन डे खेळला होता. भारताच्या 2-0 अशा ऐतिहासिक विजयात सचिनची कामगिरी निर्णायक ठरली होती. त्यानंतर कधी विश्रांतीसाठी तर कधी दुखापतीमुळे सचिननं पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुध्दच्या वन डे सीरिजमधून माघार घेतली होती. सचिनच्या गैरहजेरीत गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवागनं भारताला जबरदस्त ओपनिंग करून दिली आहे. सचिन परतल्यास ही जोडी फोडावी लागेल. आणि गंभीर किंवा सेहवागला तिस-या नंबरवर यावे लागेल.सचिनच्या परतण्यानं सुरेश रैना किंवा रोहीत शर्माला अंतिम 11 खेळाडूंतून डच्चू द्यावा लागेल. आणि म्हणूनच टीममधली जागा टिकवण्यासाठी कानपूर वन डे ही या दोंघाना एकमेव संधी असेल. कारण युसुफ पठाणच्या घणाघाती फटकेबाजीमुळे त्याला डच्चू मिळण्याची शक्यता कमीच आहे.

close