ईशांतच्या दुखापतीचे टीमला टेन्शन

December 19, 2011 1:10 PM0 commentsViews: 3

19 डिसेंबर

भारताचा फास्ट बॉलर ईशांत शर्माच्या पायाला दुखापतीमुळे भारतीय टीममध्ये चिंतेचं वातावरण आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय टीमबरोबरच्या प्रॅक्टिस मॅचमधून त्याला वगळण्यात आलं आहे. ईशांत शर्माच्या पायाचा घोटा दुखावला आहे. त्यामुळे ईशांतला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. पण 26 तारखेपासून सुरु होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचपूर्वी तो फिट होईल अशी अपेक्षा टीम मॅनेजमेंटनं व्यक्त केली. पहिल्या प्रॅक्टिस मॅचमध्येही ईशांतने फक्त 6 ओव्हर बॉलिंग केल्यानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये परतला होता. दरम्यान, दुसर्‍या प्रॅक्टिस मॅचमध्ये भारतानं 4 विकेट गमावत 160 रन्स केले आहे. कोहलीने नॉटआऊट हाफसेंच्युरी केली.

close