कांद्याच्या भावात जोरदार घसरण

December 20, 2011 10:59 AM0 commentsViews: 1

20 डिसेंबर

गेल्या आठवड्याभरापासून कांद्याच्या भावात जोरदार घसरण झाली आहे. मागील वर्षी डिंसेंबर महिन्यात प्रति क्विंटल 5 हजार रुपये भाव होता. पण यंदाच्या डिसेंबरला कांद्याचा दर आहे फक्त 300 रुपये प्रति क्विंटल. या घसरणीमुळे कांदा मातीमोल भावात शेतकर्‍याला विकावा लागतोय. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याला कमीतकमी 2 हजार हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकर्‍यांची मागणी आहे.

या मागणीसाठीच आज चांदवडला भाजपचे आमदार पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला होता. सरकार निषेधाच्या जोरदार घोषणाही त्यांनी या आंदोलनात दिल्या. तातडीने हमीभाव दिला नाही तर जगणंही अशक्य असल्याचे शेतकर्‍यांचं म्हणणं आहे. कांद्याचे निर्यात मूल्य रद्द करावे किंवा कांद्याला हमीभाव मिळावा या शेतकर्‍यांच्या मागण्या आहेत. परदेशी बाजारपेठेत कांद्याची मागणी ठप्प झाल्याने हे भाव पडत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

close