‘इंदू मिलची जागा विनामूल्य द्या !’

December 20, 2011 6:10 PM0 commentsViews: 1

20 डिसेंबर

इंदु मिलची संपूर्ण साडेबारा एकर जागा केंद्र सरकारने राज्य शासनाला विनामूल्य द्यावी असा ठराव आज सर्वानुमते विधानभेत मांडण्यात आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रस्ताव मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिलची साडेबारा एकर जागा देण्यात यावी या मागणीसाठी राजकीय पक्षांकडून वारंवार मागणी केली जातं आहे. त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलनं पुकारली आहे. तसेच गेल्या 14 डिसेंबरपासून रिपाईच्या कार्यकर्त्यांनी मिलमध्ये ठिय्या मांडला आहे. आज विधासभेत हा ठराव मंजूर झाल्यानंतर आता केंद्र सरकार या बाबत काय निर्णय घेतय हे पहावं लागेल.

close