ग्रेग चॅपल वेडा माणूस – गांगुली

December 20, 2011 11:43 AM0 commentsViews: 4

20 डिसेंबर

भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली आणि ग्रेग चॅपल यांच्यातला वाद सर्वश्रुत आहेच. यावेळी सौरव गांगुलीने चॅपल यांना चक्क वेडा म्हटलं आहे. एका चॅनलशी बातचीत करताना गांगुलीने चॅपलना वेडे म्हणून संबोधलं आहे. भारताच्या कोचपदावरून त्यांची हकालपट्टी केली त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अकादमीतूनही त्यांना काढण्यात आलं. आता सचिन तेंडुलकरला आऊट कसं करायचं याचे धडे चॅपल ऑस्ट्रेलियन टीमला देत आहे. पण सचिनला आऊट करणं सोपं नाही हे त्यांना ठाऊक नसावं असं गांगुलीनं म्हटलं आहे.

close