लोकपालसाठी आज मंत्रिमंडळाची बैठक

December 20, 2011 9:57 AM0 commentsViews:

20 डिसेंबर

आज संध्याकाळी लोकपालच्या मसुद्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. मात्र सीबीआयच्या मुद्यावर अजूनही मतभेद कायम असल्याने मसुद्याचे अंतिम स्वरूप अजूनही तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. काल दिवसभर याबद्दल अनेक बैठका झाल्या. यात सरकारचे मंत्री आणि विरोधी पक्षातले नेतेही होते. लोकपालचा मसुदा तयार करताना सीबीआय हा कळीचा मुद्दा बनला आहे. केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायणस्वामी यांची बैठक झाली. यात सीबीआयच्या मुद्यावरुन पी. चिदंबरम यांनी अनेक आक्षेप नोंदवले. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा या नेत्यांची बैठक झाली. लोकपालचा अंतिम मसुदा तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण मसुदा तयार झालेला नाही. काल सोमवारी प्रणव मुखर्जी यांनी भाजप नेत्यांशीही चर्चा केली. अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवण्यासंदर्भात मुखजीर्ंनी या नेत्यांशी चर्चा केली. दरम्यान, लोकपालचा अंतिम मसुदा अजूनही तयार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तर दुसरीकडे भाजपच्या कार्यकारिणीचीही लोकपालच्या मुद्यावर बैठक झाली.

close