लोकपालसाठी अधिवेशन 29 डिसेंबरपर्यंत

December 20, 2011 9:05 AM0 commentsViews: 2

20 डिसेंबर

लोकपाल विधेयकासाठी अखेर संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात आला आहे. 29 डिसेबरपर्यंत हा कालावधी वाढवला आहे. येत्या 22 डिसेंबरला अधिवेशनाचा कालावधी संपणार होता तसेच ख्रिसमसच्या सुट्टीनंतर पुन्हा अधिवेशन तीन दिवस सुरु राहणार आहे.आता अधिवेशन 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या दरम्यान लोकपाल विधेयकावर सविस्तर चर्चा होणार आहे. तर दुसरीकडे अण्णा हजारे यांनी 27 डिसेंबरपासून आंदोलनाचा सरकारला इशारा दिला होता त्यासाठी मुंबईतील बीकेसी मैदानावर 13 दिवसांची परवानगी सुध्दा दिली आहे आता अधिवेशनाची कालवधी 29 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे टीम अण्णा आंदोलनाची दिशा काय ठरवते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सीबीआयचा लोकपालमध्ये कशापद्धतीने समावेश असावा यावर मंत्रिमंंडळात मतभेद आहेत. सीबीआय स्वतंत्र व्यवस्था असावी तिच्यावरील राजकीय नियंत्रण कमी व्हावे अशा पद्धतीने सरकार प्रयत्न करताना दिसतं आहे. पण टीम अण्णा सीबीआयची प्रशासकीय, तपास यंत्रणा, लोकपालमध्ये असावी अशी मागणी करत आहे. पण सरकारने बनवलेल्या विधेयकाच्या ड्राफ्ट नुसार लोकपालला चौकशी करण्याचे अधिकार असतील पण तपास करण्याचे अधिकार नसतील.

close